_
विज्ञान आणि तंत्र ज्ञानाच्या जोरावर देश वेगाने प्रगती करू शकतो याची जाणीव करून देणारा शिक्षण निरीक्षक , बृहन्मुंबई पश्चिम विभाग अंतर्गत पी वार्ड विज्ञान प्रदर्शन सोहळा - २०१३-२०१४ उत्साहात संपन्न झाला. पी वार्ड विभागातील १०० हून अधिक शाळांच्या एकूण २०० हून अधिक प्रकल्पांचे सादरीकरण ह्या प्रदर्शनात करण्यात आले . विज्ञान व गणित ह्या क्षेत्रातील नवनिर्मित आविष्कारांचे अभूतपूर्व दर्शन तसेच मान्यवर संशोधकांचे मार्गदर्शन ह्या प्रदर्शनात लाभले.
मालाड पूर्व च्या कुरार गावातील मंगेश विद्या मंदिर शाळेचे ह्या प्रदर्शन समारंभात विशेष कौतुक झाले. ह्या शाळेच्या प्राथमिक गटाचा 'दंत संजीवनी ' तर माध्यमिक गटाचा 'एलोवेरा महाऔषधी' ह्या प्रकल्पांना विशेष पारितोषिके मिळाली. सौ . सुनिता मडके व सौ. भाग्यलक्ष्मी इंजमुरी ह्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश शाळेच्या हर्ष घरत, हेमंत वनगे, सुशांत कदम, सुरज गोरीवले, समीर तेली ह्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रकल्प व प्रश्न मंजुषेत उल्लेखनीय पारितोषिके मिळवली.
प्रस्तुत विज्ञान प्रकल्पाला रवि जाधव, आयुब शेख आणि सतीश हिवाळे ह्या अनुभवी माजी विद्यार्थी मित्रांचे विशेष सहकार्य लाभले.
ह्या पूर्वीही मंगेश शाळेच्या विज्ञान प्रकल्पाला (इन्स्पायर जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्पात विशेष पारितोषिके मिळाली, त्यात साईराज झिंगाडे ह्या अनुभवी माजी विद्यार्थी मित्राचे विशेष सहकार्य लाभले.
वेळात वेळ काढून अनुभवी मार्गदर्शन करणा-या मंगेश च्या ह्या सर्व माजी विद्यार्थी मित्रांचे विशेष अभिनंदन !!!