उशिरा का होईना पण कोणीतरी पुढाकार घेऊन शाळेसाठी काहीतरी करायच्या उद्देशाने पुढे आले हि अतिशय महत्वाची बाब आहे. बघ सर्वप्रथम ते मोठे भाऊ बोलल्याप्रमाणे सदस्य नोंदणी करा प्रथम. त्या नंतर लेंभे सरांनी म्हटल्याप्रमाणे तुकडीची विभागणी कर. त्या मध्ये प्रत्येक तुकडीचा एक प्रतिनिधी असेल. त्या प्रत्येकाला अतुलने म्हटल्याप्रमाणे स्वताचा अजेंडा तैयार करायला सांग कि कोणते कोणते उपक्रम राबवले गेले पाहिजेत? प्रथमत शाळेच्या वास्तूवर जास्त लक्ष केंद्रित करू नका. कारण कालच्या सभेत फक्त एकाच मुद्दा मला प्रकर्षाने जाणवत होता आणि तो म्हणजे शाळेला "आर्थिक मदत". ती तर महत्वाची आहेच पण शाळेची मुख्य संपत्ती हि शाळेची मुले आहेत. प्रथमत कमी होणारया मुलांच्या संख्येकडे लक्ष केंद्रित करा. ती कमी होण्यामागची कारणे जाणून घ्या. त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्या. त्यासाठी मुलांशी समोरासमोर संभाषण करणे खूप महत्वाचे आहे. शिक्षकांशी संभाषण करून त्यांच्याकडून अधिक माहिती घ्या. त्यांना विचारा कि त्यांच्या काय अडचणी आहेत. नाटक, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, खेळ इत्यादि कडे लक्ष दया. कॉम्पुटर हि काळाची गरज म्हटल्याप्रमाणे त्याकडे लक्ष दिलेच गेले पाहिजे. library हि खूप महत्वाची आहे. वाचनाकडे मुले कसे आकर्षित होतील, त्यासाठी काय काय करता येयील हे बघ. जे जुने माजी विद्यार्थी आहेत त्यांचा अनुभव खूप मोलाचा आहे. सुरुवात केलीच आहे तर त्या दैवी कामात स्वतःचा संसार सांभाळून झोकून द्या स्वतःला. अडचणी येतील त्यात शंकाच नाही पण जर कामाच्या प्रती भाव निस्वार्थ असेल तर आपोआप त्या अडचणी दूर होतील. अजून खूप काही मुद्दे आहेत. प्रथम तीच गोष्ट करा कि प्रत्येक तुकडीला त्यांचा अजेंडा बनवायला सांगा. आमची २००४-०५ ची तुकडी हे सगळे प्रयत्न करणार आहेत. शक्य असेल एवढे प्रयत्न आमच्याकडून केले जातील. खाली भ्रमणध्वनी क्रमांक दिले आहेत. contact मध्ये राहूच आपण. लहान तोंडी मोठा घास घेतोय खरा पण मला जे वाटले ते मी सांगितले. मी प्रथम सांगून ठेवतो कि मॉब समोर मी बोलू शकत नहि. मी भाऊक होऊन जातो & शब्द अडखळत बोलतो. आमचा प्रतिनिधी अतुल ठोंबरे हा आहे. तुम्हा सगळ्यांचे शतशः आभारी आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्चा.
- अतुल ठोंबरे , राकेश लोट.
- अतुल ठोंबरे , राकेश लोट.